Thursday, March 6, 2008

शिवसेनेचा मराठी बाणा -सोईचा की सच्चा???




Mr।M-संजय निरूपम, चंद्रिका केनिया, प्रीतीश नंदी, मुकेश पटेल, राम जेठमलानी इ. अमराठ्यांना राज्यसभेत खासदार करताना आणि उत्तर भारतीयांचे मेळावे आयोजित करताना, ठाकर्‍यांचा हा मराठी बाणा कुठे गेला होता? करूणानिधी कायम तामिळ भाषेत बोलतात. आजवर कधीही त्यांना तामिळव्यतिरिक्त इतर भाषेत बोलताना पाहिले नाही. ठाकर्‍यांनी मात्र अनेक वेळा हिंदी व इंग्लिशमध्ये मुलाखती दिलेल्या आहेत. तेव्हा कुठे जातो मराठी बाणा? "दोपहर का सामना" हे हिंदी सायंवृत्तपत्र काढून ठाकर्‍यांनी संजय निरूपमला त्याचे संपादक केले होते. हा सुद्धा मराठी बाणा आहे का?





Me(Mr।J)-अहो Mr.M तो करुणानिधी हिंदी,इंग्रजी बोलत नाही कारण त्याला दोन्हिही भाषा येत नाहित. तो अडाणी आहे हो. त्याची मुलगी मात्र इंग्रजी बोलते. त्याने मागे सरळ सरळ LTTE च्या एका महत्वाच्या अतिरेक्याला श्रीलंकन सरकारने मारल्यावर हळहळ व्यक्त करत तु किति ग्रेट होतास अशी अतिरेक्याबद्दल कविता लिहिली होती. आता अशा माणसाला इतर नेत्यांनी का फ़ॉलो कराव??? Mr.M ना बहुतेक करुणानिधी फ़ार आवडतो. आता हेही वाचा-मटातील बातमीचा काही भाग


मुंबईतल्या टॅक्सींची संख्या- सुमारे ५२ हजार


* मुंबईत टॅक्सी परमीट असलेल्या मराठी माणसांची संख्या-सुमारे २० ते २२ हजार। त्यातील दहा हजार मराठी माणसे स्वत: टॅक्सी चालवतात। *


' अजिंक्यतारा' ग्रुपमध्ये सहाशे मराठी टॅक्सी चालक। जुन्नर, कोल्हापूर, चाकणची मंडळी टॅक्सीच्या व्यवसायात *


मराठी तरुणांना टॅक्सी व्यवसायात आणण्यासाठी शिवसेनाप्रणीत ' मुंबई टॅक्सी चालक मालक सेना' संघटना कार्यरत *


शिवसेना आमदार डॉ। दीपक सावंत व सरचिटणीस दिलीप तम्मल मराठी टक्का वाढवण्यासाठी प्रयत्नशील


Mr. M,-मला करूणानिधिबद्दल अजिबात प्रेम नाही। किंबहुना त्याचा २४ तास काळा चष्मा घातलेला चेहरा, त्याचे लुंगी स्टाईलने नेसलेले धोतर (सगळेच दाक्षिणात्य - अगदी पी. चिदम्बरम सारखे शिकलेले सुद्धा, त्या विचित्र धोतर-कम-लुन्गीमध्ये वावरतात आणि त्याची त्यांना काही खंतदेखील वाटत नाही.), रामसेतूसंदर्भात त्याने प्रभु श्रीरामांवर केलेल्या आचरट कोट्या या सर्वांचा मला अतिशय संताप येतो. परंतु त्याच्या कर्मठपणामुळेच हिंदिला तामिळनाडूमध्ये शिरकाव करता आलेला नाही व तामिळ भाषा जिवंत राहिली आहे हे नाकारता येईल का? तामिळनाडूमध्ये हिंदिला अघोषित बंदी असल्यामुळेच मद्रासची मुंबई किंवा पुणे झालेले नाही. त्यामुळे बिहारि आणि भय्यांना तामिळ संस्कृतीवर आपल्या संस्कृतीचे आक्रमण करता आलेले नाही. तामिळ खासदार तामिळनाडूच्या प्रश्नावर पक्षभेद विसरून कायम एकत्र येतात. तामिळनाडूतून विधानसभेत, लोकसभेत किंवा राज्यसभेत अतामिळ कधीच निवडून येत नाही. करूणानिधि व तामिळांकडून मराठी लोकांनी हे शिकले पाहिजे. ठाकरे व शिवसेना यांचे मराठी प्रेम बेगडी आहे हे दाखविण्यासाठी मी वरील उदाहरणे दिली. त्यांची उक्ती व कृती वेगळी आहे. राज ठाकरेला जेव्हा २-३ तासांसाठी लुटुपुटीची अटक झाली तेव्हा त्याने त्याचा न्यायालयात बचाव करण्यासाठी एकूण ७ वकील नेमले होते. त्यापैकी ४ जण अमराठी होते. मुंबईत मराठी वकिलांची वानवा आहे का? तेव्हा कुठे गेला त्याचा मराठी बाणा? ठाकर्‍यांची मुले, नातवंडे इंग्रजी शाळेत शिकतात. याला मराठी बाणा म्हणायचे का?





Mr।S-संसदेत मागील दरवाज्याने प्रवेश घेण्यासाठी जे इच्छुक असतात त्यांना बहुतेक वेळी राज्यसभा उमेदवारी हवी असते. त्यामुळे अमराठी लोकांना उमेदवारी देताना त्यामागे शिवसेनेचे काही अर्थ कारण अथवा राज कारण असु शकते. परंतु याच शिवसेनेने मुंबै महापालीकेच्या मागील ३ निवडणुकांमध्ये १०० टक्के मराठी उमेदवार दिले होते. याचे कुणालाच कौतुक नाही.





Me- <<संजय निरूपम, चंद्रिका केनिया, प्रीतीश नंदी, मुकेश पटेल, राम जेठमलानी>>
Mr.S तुमच बरोबर आहे. Mr. M नी वरिल अमराठींना राज्यसभेत पाठवण्याचा विरोध केला होता. यापैकी राम जेठमलानी व चंद्रिका केनिया यांना भाजपच्या मागणीवरुन राज्यसभेत पाठवण्यात आले होते. संजय निरुपम सेनेत असताना सेनेचा आवाज घुमवायचा,स्वत्: अमराठी असुन भुमिपुत्रांसाठी बोलायचा. राज्यसभेत पाठवण्यामागे बर्‍याचदा राजकारण असते. सेनेनी पुर्वीच स्पष्ट केलय की ९४पुर्वी जे मुंबईत आलेत ते मुंबईकर आहेत. मग त्या वेळी तुम्ही लोकांनी का विरोध केला नाही???राजच म्हणाल तर त्याने फ़क्त भैय्यांना विरोध केलाय सर्व अमराठी लोकांना नाही. तामिळी लोकांची परिस्थीती वेगळी आहे. एक म्हणजे भौगोलिक रित्या ते हिंदी भाषीक प्रदेशापासुन दुर आहेत. दुसर म्हणजे त्यांची भाषा हिंदी भाषेपेक्षा खुप वेगळी आहे(आपली फ़ारशी वेगळी नाही). त्यांच्यासाठी तमीळ ही पहीली ओळख आहे(आपल्यासाठी भारतिय,हिंदु,धर्मनिरपेक्ष या पहिल्या ओळखी आहेत). द्रविडी राजकारण फ़ाळणीवादी होते तर आपले टिळक,सावरकर,राजगुरु इत्यादी भारत जोडण्यासाठी उत्सुक होते. तामीळी लोकांमधे आम्ही इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत,आमची भाषा जगातील बोलली जाणारी सर्वात प्राचीन भाषा आहे याचा फ़ाजील आत्मविश्वास आहे जो आपल्यात नाही. तमिळनाडूत सर्वपक्षिय लोक तमिळ लोकांसाठी एकत्र येतात तर आपल्याकडे फ़क्त शिवसेना,मनसे मराठी साठी बोलतात. अशा वेळी अमराठी मते मिळवण्यासाठी कॉंग्रेस,राष्ट्रवादी,भाजप त्यांना साथ देत नाहीत. त्यामुळे ठाकरे कुटुंबियांचा मराठी बाणा सोईचा असे म्हणनार्‍यांनी आधी कॉंग्रेस,राष्ट्रवादी,भाजप यांना विरोध करायला हवा कारण ते कधीच मराठीसाठी बोलत नाहीत. असे असुनही तामीळी चित्रपटांमधे अतामिळी हिरो-हिरॉइन्स भरपुर आहेत. बर्‍याच हिरॉइन्स हिंदीभाषीक आहेत. शिवाय सध्याच्या ग्लोबलायझेशनच्या जमान्यात अतामिळी लोक चेन्नईत वाढत आहेत पण माहीती तंत्रज्ञानात त्यांचे राज्य मागे पडू नये म्हणुन तामिळी नेते त्यांना विरोध करत नाहीत.



Mr.M-<<आपल्यासाठी भारतिय,हिंदु,धर्मनिरपेक्ष या पहिल्या ओळखी आहेत)। >>हिंदू आणि धर्मनिरपेक्ष यांच्यातून विस्तव सुद्धा जात नाही. एकवेळ स्वतःला हिंदू म्हणणारे धर्मनिरपेक्ष या संबोधनाला फारसा विरोध करणार नाहीत. पण स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणविणार्‍यांना हिंदू हा शब्द म्हणजे कुणीतरी शिवी हासडल्यासारखे वाटते. <<तमिळनाडूत सर्वपक्षिय लोक तमिळ लोकांसाठी एकत्र येतात तर आपल्याकडे फ़क्त शिवसेना,मनसे मराठी साठी बोलतात. अशा वेळी अमराठी मते मिळवण्यासाठी कॉंग्रेस,राष्ट्रवादी,भाजप त्यांना साथ देत नाहीत. त्यामुळे ठाकरे कुटुंबियांचा मराठी बाणा सोईचा असे म्हणनार्‍यांनी आधी कॉंग्रेस,राष्ट्रवादी,भाजप यांना विरोध करायला हवा कारण ते कधीच मराठीसाठी बोलत नाहीत. >>शिवसेना सोडून इतर पक्ष मराठी लोकांसाठी काही बोलत नाहीत व काही कृतीही करत नाहीत. शिवसेनावाले फक्त बोलतात, पण कृती बरोबर विरूद्ध असते. नुसते बोलून काही कृती न करण्यापेक्षा न बोलणारे व कृती न करणारे कमी फसवणारे नाहीत का? <<संसदेत मागील दरवाज्याने प्रवेश घेण्यासाठी जे इच्छुक असतात त्यांना बहुतेक वेळी राज्यसभा उमेदवारी हवी असते. त्यामुळे अमराठी लोकांना उमेदवारी देताना त्यामागे शिवसेनेचे काही अर्थ कारण अथवा राज कारण असु शकते. परंतु याच शिवसेनेने मुंबै महापालीकेच्या मागील ३ निवडणुकांमध्ये १०० टक्के मराठी उमेदवार दिले होते. याचे कुणालाच कौतुक नाही.>> पूर्वी बाबासाहेब भोसल्यांनी जाहीरपणे सांगितले होते की राज्यसभेच्या उमेदवारीसाठी त्यांना २५ लाख रूपये शिवसेनेने मागितले होते. त्यांनी ते न दिल्यामुळे कोणत्यातरी अमराठीला (मुकेश पटेल किंवा प्रीतीश नंदी असावा) ते तिकिट मिळाले. वा रे मराठी बाणा! शिवसेनेने मराठी उमेदवार दिले यात काही विशेष नाही. त्यांनी अमराठी उमेदवार दिले तरी अमराठी मतदार कॉंग्रेसच्याच अमराठी उमेदवारांना मत देतील. भाजपने मुसलमानांचे कितीही लांगूलचालन केले तरी त्यांना मुस्लिमांची मते मिळत नाहीत. त्याचप्रमाणे शिवसेनेला अमराठ्यांची मते मिळत नाहीत. म्हणूनच मग १०० टक्के मराठी उमेदवार दिल्याचे नाटक करावे लागते तात्पर्य काय कोणताही पक्ष मराठी माणसांसाठी काहिही कृती करत नाही. इतर पक्ष बोलत सुद्धा नाहीत. शिवसेनावाले फक्त बोलतात व त्यामुळे काही लोकांच्या अपेक्षा उंचावतात. पण कृती मात्र शून्य आहे. न बोलून न करणार्‍यांपेक्षा नुसते बोलून न करणारे जास्त वाईट








Me-बोलुन कृती नाही वगैरे नाही. आणि कुठली कृती विरुध्द होती??तुम्ही दिलेल्या ५ पैकी २ लोकांना भाजपामुळे राज्यसभेत पाठवण्यात आले व एक तर सेनेचा स्वत्:चा नेता होता। राज्यसभेतील उमेदवारी मराठी बाणा नाही हे स्पष्ट करते मात्र महापालिकेतील १००% मराठी उमेदवारी मराठी बाणा आहे हे स्पष्ट करत नाही???हे असे double standards का???एकच नियम ठरवा-उमेदवारी मराठी बाणा स्पष्ट करते का नाही??हो असेल तर मपा मधिल उमेदवारी पण बघा आणि नाही असेल तर राज्यसभेतील उमेदवारी पण बघु नका।बाबासाहेब भोसल्यांनी कुठलिही गोष्ट म्हटली की ती बरोबर ठरते का??आणि जरी पैशाची मागणी केली असेल तरीही आज भारतात कुठला पक्ष आहे जो पैसे घेउन उमेदवारी देत नाही??मुंबैत आता फ़क्त १६% मराठी माणसे आहेत। त्यामुळे फ़क्त त्यांचीच मते सेनेला मिळत असती तर मुंबई महापालिकेत सेना निवडुन येउच शकली नसती। शिवसेनेने टॅक्सी ड्रायव्हर्समधे मराठी लोक आणावेत यासाठी केलेले प्रयत्न कालच्या इथे टाकलेल्या मटाच्या लेखात दिले होते। सेनेने मराठी तरुणांना खाद्यपदार्थाचे स्टॉल्स वगैरे टाकुन देण्यात मदत केली होती मात्र नंतर मराठी तरुणांनी ते स्टॉल्स भैयांना भाड्यानी दिले। सेनेनी शासनात आल्यावर अमराठी लोकांसाठी पर्मिट सिस्टिम आणली मग इतर सर्व पक्ष व न्यायव्यवस्थेने ते होउ दिले नाही। इतरही अनेक उदाहरणे आहेत। पण हे सगळे लक्षात न घेता बाळासाहेब हिंदी अथवा इंग्रजीत का बोलतात हा प्रश्न तुम्हाला महत्वाचा वाटतो. करुणानिधी एक अडाणी आहे म्हणुन काय सर्वांनीच अडाणी रहायच काय??त्याची मुलगी इंग्रजीत बोलते म्हणुन तमीळ भाषेवर संकट आलं काय??कलाम,जयललिता,चंद्राबाबु,देवेगौडा,चिदंबरम हे लोकही इंग्रजीत बोलतात मात्र त्यांच्या इंग्रजी बोलण्याने त्यांच्या भाषेचे नुकसान झाले आहे असे कोणाला कधीही वाटलेले नाही. मोदीनेही गुजराती अस्मिता आणली पण मोदी तर हिंदी बोलतच नाही तर हिंदीत भाषणही करतो. मुळात मराठी माणुस व भाषा वाचवायला काय रामबाण उपाय आहे हे आपल्याला माहित नाही. त्याचप्रमाणे सेना,मनसेलाही ते माहीत नाही. त्यांना ज्या गोष्टींमधुन मराठी माणुस,भाषा वाचेल असे वाटते त्या गोष्टी ते करतात. त्यांनी काय करायला नको पेक्षा काय करायला हव हे तुम्ही लोकांनी सुचवा(बाळासाहेबांनी इंग्रजीत बोलु नये म्हणु नका). <<हिंदू आणि धर्मनिरपेक्ष यांच्यातून विस्तव सुद्धा जात नाही.>> माझ म्हणन होत कि आपली पहिलि ओलख भारतिय अथवा हिंदु अथवा धर्मनिरपेक्ष अथवा इतर काही असते आणि त्यांची ती तमिळ असते





Mr.M-<< राज्यसभेतील उमेदवारी मराठी बाणा नाही हे स्पष्ट करते मात्र महापालिकेतील १००% मराठी उमेदवारी मराठी बाणा स्पष्ट करत नाही???हे असे double standards का???एकच नियम ठरवा-उमेदवारी मराठी बाणा स्पष्ट करते का नाही?? >> कुठे आहे? Standard एकच आहे। ते म्हणजे जो जास्त माल देईल त्याला उमेदवारी! फक्त शिवसेनाच नव्हे तर सर्व पक्षांचे हेच Standard आहे. पण हे Standard उघड दाखविता येत नाही. म्हणून मग कॉंग्रेसला निधर्मी बाणा, भाजपला हिंदू बाणा, शिवसेनेला मराठी बाणा असे बाणे दाखवावे लागतात. तुम्हाला अजून माझे बोलणे पूर्ण समजलेले दिसत नाही. कॉंग्रेसची धर्मनिरपेक्षता व भाजपचे हिंदुत्व जितके प्रामाणिक (किंवा अप्रामाणिक) आहे, तितकाच प्रामाणिक (किंवा अप्रामाणिक) शिवसेनेचा मराठी बाणा आहे.





Me-अहो Mr।M पैसाच जर स्टॅन्डर्ड असते तर त्यांनी मनपाच्या निवडणुकिलाही भैय्यांकडुन पैसे घेउन उमेदवारी दिली असती ना!!! असो जर सर्वच पार्ट्यांमधे फ़क्त पैसाच तिकिट मिळवण्यासाठी पुरेसा असेल तर मग फ़क्त सेनेलाच दोष देउ नका.





Mr।M-<< अहो Mr.M पैसाच जर स्टॅन्डर्ड असते तर त्यांनी मनपाच्या निवडणुकिलाही भैय्यांकडुन पैसे घेउन उमेदवारी दिली असती ना!!! >>भैय्यांकडून पैसे घेऊन उमेदवारी दिली तर, तथाकथित मराठी बाण्याबद्दल कशी बडबड करता येईल? त्यापेक्षा मराठी उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना उमेदवारी दिली तर एका दगडात दोन पक्षी! << असो जर सर्वच पार्ट्यांमधे फ़क्त पैसाच तिकिट मिळवण्यासाठी पुरेसा असेल तर मग फ़क्त सेनेलाच दोष देउ नका. >>माझी याआधीची पोस्ट्स् नीट वाचा. सेना, भाजप, कॉंग्रेस इ. सर्व पक्ष सारखेच आहेत असे मी म्हटले आहे. त्यांच्यात कोणताही गुणात्मक फरक नाही. फरक एवढाच आहे की त्यांची प्रत्येकाची जनतेला फसविण्याची वेगवेगळी theme आहे. शिवसेना मराठी बाणा या कारणासाठी मराठी उमेदवारांना तिकिट देते हा तुमचा भोळसटपणा म्हणायचा की अज्ञान!





Me-शिवसेनेमुळे मराठी बाणा जिवंत आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्यामुळे मुंबईत मराठी माणुस फ़क्त १६% असुनही मराठी माणसाला महत्व आहे. त्यांची ४० वर्ष मराठी माणसची अस्मिता जागरुक ठेवली आहे. एके काळी मुंबईत मराठी चित्रपटांना चांगली चित्रपटगृह मिळत नसत त्यावेळी शिवसेनेनी त्यासाठी प्रयत्न करुन ती मिळवुन दिली याची आठवण दादा कोंडकेंनी अनेकदा सांगितली होती. बाकी राजला विरोध करण्याशिवाय सेनेकडे दुसरा पर्यायच नव्हता कारण ४० वर्ष प्रयत्न करुन जी वातावरणनिर्मिती त्यांनी केली ती राज़ ठाकरेनी रात्रीत हायजॅक केली. बाकी महाराष्ट्रासाठी राज व उध्दवने व्यक्तिगत भांडणे विसरुन एकत्र येण्यातच मराठी माणसाचे हीत आहे.

26 comments:

Anonymous said...

mitra same blog pls sadhye font madhye publish kar naa! vachayala khup tras hoto...

majha hi senevar ek blog aahenakki bagh
http://ekachlakshya.blogspot.com

Anonymous said...

मित्रा अतिशय समर्पक उत्तरं दिली आहेत तु.
धन्यवाद.

ram

Anonymous said...

Shiv Sena Bhavan Madhe Uttar Bharatiyancha Melava Zhala ...

Yavarunach Tharava ...

mandar

Anonymous said...

ata soichach aahe... ghar ka na ghat ka zalyavar te tari kay karnar....

JAY MAHARASHTRA MANASE!!!

Anonymous said...

Ha prashna yenyachi vel yenyasarkhe vaait te kay? Jyanchya kadun apeksha kelya tyanchya baddal lihave lagtey ki tyancha marathi bana manapasoon nasun soyeepurta aahe.

shirish

Unknown said...

शिवसेनेने मराठी माणसासाठी एवढे करूनही कोणी त्यांना नाव ठेवत असेक तर तो भडवाच

Anonymous said...

सोईचा aahe

saacha asta tar raj thakre laa support kela asta

Anonymous said...

तुझ्या प्रयत्नांना भगवा सलाम !!!
शिवसेनेबद्दल पुर्वग्रहदुषीत असलेल्या टरफलांना तु सडेतोड उत्तरे दिलीत...लढवय्या शिवसैनीक असल्याची ती जणु एक पावतीच होती... तुझ्या प्रयत्नांना भगवा सलाम !!!

Anonymous said...

think Shivsena is doing "Chance pe Dance"(due to gag order on RAJ)...Shivsena "think-tank" now fears that their tradiational vote bank is in danger....Shiv senela barach vel milala aahe (marathi mansasathi kahi karnyasathi)..
Its true that MNS ani SS will not try to back each other..te ektra yetil ki nahi he 2009 MNS chya performance war awalambun aahe.
Still we must thanx shri Balasaheb thakeray for such awesome editorial in samaana..
Kadachit Raj War bandi nasti tar tyachya kadun hi asach kahitari yenyachi apeksha hoti..

Anonymous said...

सकाळी वाट चुकलेला संध्याकाळी घरी परतला, तर तो घर सोडून गेला होता अस कोणी म्हणत नाही

MiMarathi said...

bandi asunahi rajne loksatta v mata t lekh lihilet.
aso mulaat maharashtrala jar rajchya mhananyapramaane europe banavayache asel tar swastatala rojgaar asaa gamavaavaa kaa haa vichar aataa maharashtrat hone garajeche aahe. europe,US vagaireni jagabharatalya swast workers cha vaapar karun vikas ghadavalaa. tech tar capitalists ni kela aani capitalism shivaay maharashtracha vikaas shakya naahi. aataa issue shant jhaalyavar maharashtraat yaavar vichar vhayla havaa

Anonymous said...

first of all there is no point comparing maharashtra with western countries...tyala ajun kiman 50 varshe lagtil..

swastatla rojgar ? hya kamat sthanikana pradhaya dilyane kahi bighadnar aahe ka?
Europe ameriket kam karayla lok mulatach kami aahet..tithlya "qualified/skilled" lokana kamasathi bhatkav lagat nahi....
shivay tithe work permit aani visa sathi amaf paisa otawa lagto..
shivay tithe janara manus law and order modat nahi..
tyamule he comparision karne ayogyach...

Europ fakt maharshtrachach kashala kartay..sampurn bhartacha kara na!!

Raj ne upasthit kelelya muddyan paiki "bhumi putrana pradhanya,marathi culture " he mudde ekdam baobar aahet!!! hya mudhyana ugachach broad minded bananyacha aaw aanun virodh karnyat kahi arth nahi.

MiMarathi said...

Rajne mhatalay ki maharashtracha mala europe banavaaycha aahe mhanun mi to mudda lihila.tyane bharaaacha europe banavaayacha aahe ase mhatalela naahi.

marathi maanus bhaiyyanitka swastat rojgar karayala tayaar hot naahi. sthanikaanna pradhanya deu nakaa asa mi mhanat naahiye. mi vicharatoy ki jar sthanik itakya swastat kaam karaayala tayaar naahit tar kaay???ekaach dukaanaat bhaiyya nokarala 50ru aani marathila 100ru asa hou shakel kaay??europe ,US madhe kaam karaayala lok kami aahet he barobar pan aapalyakadehi hi kami darjaachi kaame karayala lok tayaar naahit.tyamule kami darjaachi kaame karayala aapalyakadehi sthanik kami aahet e.g.shivseneni marathi tarunanna food stalls,wadapaav stalls takun dile pan kaahi varshaanni marathi tarunaanni te stalls bhaiyyanna bhadyani dile.kaa tar kamipana vaatato.mumbaitil ardhya marathi taxi driversni aapali taxi bhadyani dili aahe jyaat mukhyatve bhaiyyanna taxi bhadyani dili geliy.Visa sathi paisa otava laagato barobar aahe pan aapan he karu shakat naahi kaaran te aapalyach deshache lok aahet.

mi broad minded bananyacha aaw aanat naahiye naahi mi Rajla virodh karatoy. mi fakt kaahi prashn maandatoy jyakade yaa aandolanat kunachech faarase laksh gelele naahi.marathi culture aani law n order yaa muddyaanna maajhaa kaahihi virodh naahi.

Anonymous said...

Keval Saccha

Ashish Kulkarni

Anonymous said...

Tu ShivSenechi Baju faar changali mandali ahes...
sadetod uttar devun..Hadache shivsainik tujhya sarakhech asatat...

Jhatayachach....apalya shivsenesathi...bhagavyasathi !!!


jai hari

Anonymous said...

these outsiders are outnumbering locals...aani he fakt mumbaitach nahi tar delhi,punjab,aasam,bangal ,karnatak ithe hi aahe. mag kay hya saglya pradeshatil lok hi kami darjachi kam karayla tayar nahi ase mhanane yogya hoil ka?
farak fakta yevdhach ki mumbai madhe aawaj uthawla gela..

mul mudda ha aahe ki fakt ekach community chya lokana sampurn deshat virodha ka hoto hyacha vichar karayla haway..

ti lok garib aani mehanati aahet hyat kahich prshan nahi...so no personal khunnas on them..aani mala nahi watat marathi lok kami darjachi kam karayla kami pana manatat..
hi chukichi samjut aahe aani ti mostly parprantiyani pasaravli aahe aani kahi so called broad minded marathi lokani tyala dujora dilay..
aso..mi kititari marathi lokana olakhto je hi sarv kam kartat..pan aata problem asa aahe ki hya outsiders mule competition wadhliy.....aani jar he londhe asech wadhat rahile na tar nakkich sthanikana dombivalichya hi palikade jave lagnar..

Hya cheap labour mule chhotya mothya business men la fayda hotoy pan sthanik garib jantech kay? kiti business men true income declare kartat? kiti lok proper tax bhartat? to piasa parat distribute hoto ka? aani kiti out siders tax bhartat? are they contributing for the civic fascilities that they are getting? in fact they believe in breaking the law...enchroching the footpaths..bossing around customers etc etc.. aani he sagle tyanchya sathi normal aahe karan they are brought up like that only.

mumbai has reached its threshold..it is lacking in infrastructur..tya mule aadhi hya payabhut suvidha uplabdh zalya pahijet ..aani tyacha fayda stanikanach zala pahije..

rahili gosht marathi language n culture chi.. tya madhe compromise karnyach vichar hi karu naye.


prashant

Anonymous said...

shivsena done nothing for marathi manus


ganesh

MiMarathi said...

**mul mudda ha aahe ki fakt ekach community chya lokana sampurn deshat virodha ka hoto hyacha vichar karayla haway..**

mi tyala virodh kelela naahich aahe.yaachaa vichar UP,Bihar madhe vhaylach havaa

**mi kititari marathi lokana olakhto je hi sarv kam kartat..**

generalisation mule anekanvar anyaay hoto yaat vaad naahi.pan aandolananchya veli generalisation hotach asata tyala paryay naahi. jyapramaane tumhi kami darjaaji kaame karanaari marathi maanas paahili aahet tyapramaane marathi sanskrutila,bhashela swikaaranaari,tyacha aadar karanaari UP,Biharachi maanasehi mi anek paahili aahet.competition vaadhatey he barobar aahe pan marathi maanase competition madhe tikat naahit kaaran itaki kami darjaachi kaam itakya kami paishaat karayala marathi maanasa tayaar hot naahit(kaahi hot asatilahi pan anek hot naahit).

chhote mothe businessman asanahi faar garajecha aahe.shivaay marathi maanus garibit jaayalaa laagalaay tar tyane UP,Biharyapramaane kami darjaachi kaam kami paishat karaayala havi.

baaki bhiyyanchya samasyela upaay kaay aahe????kiti diwas tyanna maranaar????tyanchya raajyaat itaki vaait paristhiti aahe ki te kitihi risk gheun ikade yenaarach.aaj naahi tar udya,udya naahi tar parwa yetilach.he thambavaayalaa kaay upaay aahe???????

Anonymous said...

saccha

abhishek

Anonymous said...

kahi sangta yet nahii..

bala sahebanch pakkaa..

pan udhav badal sangh ta yet nahi

akshay

Anonymous said...

shisenecha marathi bana soicha asel hi , pan aaj shivsena & m.n.s mule marathi
mansala sthan aahe mumbai madhe.

Anonymous said...

soicha

santosh

Anonymous said...

शिव सेने ने मराठी मानासचा मुदा फकत निवड नुकिकरता वापरला आहे .
बालासाहेब होते त्यावेलेस ठीक होते पन आता ....
आणि त्या शिव सेना भवनत भइया लोकांचे मेलावे कोणी घेतला माहिती आहे ka ?
नसेल तर मी सांगतो ...

आरे इतका पुलका आसेल ना तर या कधी नासिक ला आणि पहा हे भइया किती माज्ले आहे ते ...

ninad

MiMarathi said...

शिवसेनेने मराठी चा मुद्दा जर फ़क्त निवादानुकान्साठी वापरला आहे तर मनासेने नाही का???आधी म्हटले की आम्ही कुनाच्याही विरुध्द नाही ,मग नंतर ते चालेना मग म्हटले की भैय्यांच्या विरुध्द ?? शिवसेना भवनात एक मेलावा आयोजित केल्याने गेल्या ४० वर्षात मराठी मानासासाथी,भाशेसाठी केलेल काम नाहिसा होत का???दूसरा म्हणजे भैय्यांच्या बाजूने मी काहीही लिहिलेले नाहिये ते किती माजलेत हे मलाही माहित आहे.

Anonymous said...

soicha

santosh

Unknown said...

Shivsena Marathi Lokancha Sanman Ahe.
Shivsena Ahe Mhanun Marathi Manus Ahe.